पुणे -लष्करी सराव सुरू असताना झालेल्या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला. याच अपघातात पाचजण जखमी झाले. खडकी येथे असलेल्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) गुरुवारी दुपारी ही घटना घडली. या दुर्घटनेत लान्स हवालदार संजीवन पी. के. आणि नाईक भिवा वाघमोडे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती लष्कराच्यावतीने देण्यात आली.
पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात सरावादरम्यान दोघांचा मृत्यू - लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे न्यूज
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) सरावादरम्यान झालेल्या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाचजण गंभीर जखमी आहेत.
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस निरीक्षकाच्या मुलाची आत्महत्या
महाविद्यालयात पूल बांधणीचे प्रशिक्षण आणि सराव करण्यात येत होता. त्यावेळी अचानक पूल कोसळला त्यात सराव करणारे जवान जखमी झाले. जखमींना उपचारासाठी दाखल करत असताना दोघांचा मृत्यू झाला. जखमींना खडकी येथील लष्करी रुग्णालयात आणि पुण्यातील कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृत जवानांच्या कुटुंबीयांना याबाबत कळवण्यात आले.
Last Updated : Dec 26, 2019, 7:52 PM IST