पुणे- देशभर कोरोनावर मात करण्यासाठी लढाई सुरू आहे. अशातच खेड तालुक्यातील वाशेरे गावात रेशन दुकानाच्या तक्रारीवरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कोयता, लोखंडी रॉड, दगडाने दोन गटात तुफान मारामारी झाली. यात चारजण गंभीर जखमी झाले, तर दुसऱ्या गटातील घरातील संसार उपयोगी साहित्य, वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. जखमींवर पिंपरी चिंचवड येथील डी.वाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
खेड तालुक्यातील वाशेरे गावात रेशन दुकानाच्या तक्रारीवरून दोन गटात तुफान हाणामारी, ४ जण गंभीर - khed police
खेड तालुक्यातील वाशेरे गावात रेशन दुकानाच्या तक्रारीवरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. कोयता, लोखंडी रॉड, दगडाने दोन गटात तुफान मारामारी झाली.
वाशेरे येथे रेशन दुकानदारबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. या तक्रारींचे निरासन तहसीलदार, पोलिसांनी गावात बैठक घेऊन वाद मिटवण्यात आला होता. मंगळवारी दुपारच्यावेळी एका गटाने रेशन दुकानावर जाऊन रेशन दुकानदार यांच्याशी बाचाबाची करत रेशन दुकांनावर हल्ला केला. दुकानातील रॉकेल डब्बे फेकून दिले. तसेच ७ जणांना काठ्या कोयता, लोखंडी गजांनी मारहाण केली.
चिडून दुसऱ्या गटाने गावातील घरांवर हल्ला करून घरातील संसार उपयोगी वस्तू फेकून दिल्या. तसेच चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात १२ जण जखमी झाले आहेत. त्यामधील ४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ८ जण चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. खेड पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या परपस्पर तक्रार देण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे करत आहेत.