महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कालव्यात दुचाकी कोसळून आजोबा अन् नातीचा दुर्देवी अंत' - पुणे जिल्हा बातमी

बारामती येथील पाटस रस्त्यावरील तीन मोऱ्या नजिक झालेल्या अपघातात आज (दि. 9 मे) आजोबा आणि नातीचा दुर्देवी अंत झाला.

उत्तम नामदेव पाचांगणे
उत्तम नामदेव पाचांगणे

By

Published : May 9, 2021, 7:58 PM IST

बारामती (पुणे)- येथील पाटस रस्त्यावरील तीन मोऱ्या नजिक झालेल्या अपघातात आज (दि. 9 मे) आजोबा आणि नातीचा दुर्देवी अंत झाला. आज सकाळी कुरकुंभ येथून आपली नात (मुलीची मुलगी) समृध्दी विजय चव्हाण (वय 12 वर्षे, रा. कुरकुंभ, ता. दौंड) हीला दुचाकीवरुन घेऊन आजोबा उत्तम नामदेव पाचांगणे (वय 52 वर्षे, रा. सातववस्ती, बारामती) हे बारामतीकडे निघाले होते. सकाळी दहाच्या सुमारास पाटस रस्त्यावरुन त्यांनी आपली दुचाकी नीरा डावा कालव्याशेजारील भरावावरुन सातव वस्तीकडे घेतली.

एका बाजूला नीरा डावा कालवा व दुसऱ्या बाजूला कऱ्हा नदी, असा हा इंग्रजांच्या काळात नदीवर कालव्यासाठी बांधलेला पूल आहे. या पूलाच्या भरावाच्या शेवटच्या टोकापर्यंत उत्तम पाचांगणे यांनी दुचाकी व्यवस्थित नेली. मात्र, शेवटच्या टोकानजीक दुचाकी गेल्यावर त्यांना गाडी सावरली नाही. त्यांनी पाय खाली टेकविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची दुचाकी दोघांसह नीरा डावा कालव्यात कोसळली. जेथे दुचाकी कोसळली तेथे पाण्याला ओढ आहे व प्रवाह वेगाने वाहतो. त्यामुळे य दोघांना बचावाला संधीच मिळाली नाही. पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाने हे दोघेही वाहून जाऊ लागल्यानंतर उत्तम यांनी समृध्दीला वाचविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही.

हेही वाचा -कोरोनाच्या धर्तीवर माणिकडोह बिबट निवारा केंद्रात बिबट्यांसाठी स्वतंत्र क्वारंटाइन कक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details