पुणे : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज (दि. 23 जून) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
मृत व्यक्तीची नावे अद्याप समजू शकलेले नाहीत. मृत व्यक्तींचे वय हे अंदाजे 30 ते 35 असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हे पीकअपने मुंबईच्या दिशेने जात होते. परंतु, काही अंतरावर त्यांची गाडी बंद पडली. त्यामुळे ते पुण्याच्या दिशेने उलट चालत येत होते. तेव्हा, त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.