पिंपरी-चिंचवड- कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने 25-30 वारकरी जखमी झाले आहेत. तर, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास कान्हेफाटा येथे घडली. ( Accident of Pickup in Kartiki Wari Dindi Near Kanhefata ) पिकअप चालकाला वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ( Wadgaon-Maval Police )
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालापूर उंबरी गाव येथून सुमारे दीडशेपेक्षा अधिक वारकरी हे आळंदीच्या दिशेने कार्तिकी यात्रेनिमित्त निघाले होते. हरिनामाचा गजर करत वारकरी रस्त्याच्याकडेने पायी जात होते. तेव्हा, जवळून जाणाऱ्या पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले आणि वारकऱ्यांच्या रांगेच्या मधोमध जाऊन काही जणांना धडक दिली. यात 25-30 वारकरी जखमी झाल्याची माहिती वडगाव मावळ पोलिसांनी दिली आहे. अद्याप गंभीर किती आहेत हे समजू शकेल नाही. मात्र, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पिकअप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
कर्जत व खालापूर तालुक्यातील सर्व प्रवासी -
वडगावचे पोलीस निरीक्षक विलास भोसले म्हणाले की, जखमी विविध रुग्णालयात असल्याने त्यांनी माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. प्रथम सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील उंबरे, कर्जत, खालापूर, खोपोली भागातील 200 वारकरी या पायी पालखीमध्ये होते. पहाटेच्या सुमारास माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट उंबरे खालापुर ही पालखी आळंदीकडे जात असताना साते गावाजवळ सदरचा भिषण अपघात झाला आहे.
हेही वाचा -VIDEO : कोकण-पश्चिम महाराष्ट्रला जोडणारा चिपळूण येथील कुंभार्ली घाट ठप्प
या अपघातामध्ये सविता वाळकू येरंब (वय 58, रा. उंबरे, खालापूर, रायगड) व जयश्री आत्माराम पवार (वय 54, रा. भूतवली, ता. कर्जत, जि रायगड) यांचा मृत्यू झाला. तर मंदा बापु वाघमारे, वनिता बबन वाघमारे, रंजना गणेश वाघमारे, राजश्री राजेश सावंत (सर्व रा. उंबरे गाव, खालापुर), सुरेखा तुळशीराम कर्णक, वंदना राम कर्णक, माणिक कर्णक (तिघेही रा. बीड खुर्द), शोभा सावंत, पुष्पा पालकर, अनुसया जाधव, बेबी कदमुख, अनुसया मधुकर जाधव, दिव्या दीपक धंदावकर, आशा साबळे, रामदा आहेर, सोनाबाई धोरगे, पुष्पांजली कर्णक, सुभद्रा सिताराम शिंदे, बेबी सावंत, दिव्या चांदूरकर, सुरेखा चोरगे, सुभद्रा सदाशिव चोरगे, रंजना अशोक कर्णक, राधिका बाळकृष्ण भगत हे जखमी झाले आहेत.