महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मालवाहू जीप-कंटेनरचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू - मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतिमहामार्ग

कंटेनर आणि मालवाहू जीपचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

अपघातग्रस्त वाहन

By

Published : Nov 16, 2019, 5:17 PM IST

पुणे- कंटेनर आणि मालवाहू जीपचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने दोन्ही गाड्या जात होत्या. अद्याप मृत व्यक्तीचे आणि जखमींचे नाव समजू शकली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीचच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत भरधाव वेगात असणाऱ्या मालवाहू जीपने पुढे असणाऱ्या कंटेनरला मागून धडक दिली. यात मालवाहू जीपमधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मालवाहू जीपचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी लोणावळा ग्रामीण पोलीस आणि देवदूत बचाव पथक दाखल झाले आहे. अद्याप मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजू शकलेली नाहीत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - नितीन गडकरी म्हणाले... 'माझ्या विभागात एका रुपयाचा भ्रष्टाचार होत नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details