पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील दोन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तालयातील झोन दोन चे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणेंनी या कारवाईचे आदेश दिले. दोन्ही गुन्हेगारांवर सांगवी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
पिंपरी-चिंचवडमधील दोन सराईत गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार; पोलिसांची कारवाई
गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या दोन गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन दोन चे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणेंनी या कारवाईचे आदेश दिले. दोन्ही गुन्हेगारांवर सांगवी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
आनंद उर्फ पेट्या चंद्रशेखर कोळी (22, रा. पिंपळे निलख) आणि रोशन मुरली सोळंके (19 रा. जुनी सांगवी) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्यांना दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. आनंद उर्फ पेट्या कोळीवर खुनाचा गुन्हा, आर्म ऍक्ट, मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. तर रोशनवर विनयभंग, मारामारी, तोडफोड असे गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी तडीपारचे आदेश दिल्यानंतर सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, गुन्हे पोलीस पोलीस निरीक्षक अजय भोसले, पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर, यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी शिमोन चांदेकर, नाना झेंडे, महिला पोलीस कर्मचारी नूतन कोंडे यांचा सहभाग आहे.