बारामती (पुणे) - ताडी पिल्याने दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच, तिघांवर उपचार सुरू आहेत. दु:खद घटना म्हणजे दारू पिणारे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. राजू लक्ष्मण गायकवाड (वय ३५), हनुमंता मारुती गायकवाड (वय ४०, दोघेही रा. चंदननगर, माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) अशी मृत्यू पडलेल्या व्यक्तिंची नावे आहेत.
Death Due To Toddy Liquor: विषारी ताडी दारू पिल्याने दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू
विषारी ताडी (दारू) पिल्याने दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर, इतर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. एका संशयताला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे गावात तणावाची परिस्थिती असल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. याबाबत माहिती अशी की, माळेगाव नगर पंचायतीच्या चंदननगर भागात भटक्या समाजाची मोठी लोकवस्ती आहे. या वस्तीमधील मृत्युमुखी पडलेल्या समवेत इतर ताडी पिणारे भैरु चिनापा गायकवाड, भिमा चिनाप्पा गायकवाड, भीमा कलाप्पा भोसले ह्या तीन युवकांवर बारामती येथे उपचार सुरू आहेत.
मयत राजू गायकवाड यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे, तर हनुमंता गायकवाड यांच्या मागे पत्नी दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मृत्यूमुळे चंदननगर भागात मोठा आक्रोश पहावयास मिळाला.दरम्यान याबाबत अरुण सनी भोसले (रा.चंदननगर माळेगांव) फिर्याद दिली असून संशयित आरोपी संदिप मोहन साठे,मोहन साठे,मोहनची पत्नी (सर्व रा.विक्रमनगर माळेगांव) यांचे गुन्हा दाखल करण्यात आला असून संदिप मोहन साठे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.