बारामती- दगडखाणीमध्ये साठलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या दोन लहान मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती परिसरातील पिंपळीमध्ये ही घटना घडली आहे. सम्राट संतोष शिंदे (वय ८) आणि देवा तानाजी शिंदे ( वय ९) अशी या मुलांची नावे आहेत.
पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू - पुणे जिल्हा लेटेस्ट न्यूज
दगडखाणीमध्ये साठलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या दोन लहान मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती परिसरातील पिंपळीमध्ये ही घटना घडली आहे. सम्राट संतोष शिंदे (वय ८) आणि देवा तानाजी शिंदे ( वय ९) अशी या मुलांची नावे आहेत.
![पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10391590-656-10391590-1611673643138.jpg)
पाण्याचा आंदाज न आल्याने बुडाली मुले
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना समोर आली. मृत्यू झालेल्या मुलांचे आई-वडील मोलमजुरी करतात. ते कामासाठी बाहेर गेले होते. मुले दुपारी घरापासून जवळच असणाऱ्या दगडखाणीत साठलेल्या पाण्यात पोहायला गेले होते. त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी त्यांचे आई-वडील घरी आल्यानंतर मुले दिसत नसल्याने, त्यांनी शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना दगड खाणीतील पाण्यात दोन्ही बालकांचे मृतदेह आढळून आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.