पुणे - जुन्नर तालुक्यातील ओतूर जवळ आमीरघाट येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. याच आगीत आणखी दोन मुले गंभीर भाजली आहेत, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. भाग्यश्री कैलास ठाकूर (वय 4) आणि शिवा कैलास ठाकूर (वय 2) अशी या मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत, तर नम्रता शुभम दमई (वय 8) आणि ग्यानेंद्र शुभम दमई (वय 8) जखमी आहेत.
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन चिमुकल्यांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी - जुन्नर आग
ओतूरजवळ आमीरघाट येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. याच आगीत आणखी दोन मुले गंभीर भाजले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील औंध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
जुन्नर आग
हेही वाचा -'राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर; पुणे, मुंबईसह रत्नागिरीतही आढळला रुग्ण
कैलास ठाकूर हे रात्री दूध घालण्यासाठी बाहेर गेले होते. याचवेळी घरा शेजारील जनावरांच्या चाऱ्याला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत जवळ खेळणारे चारही चिमुकले अडकले. यातील दोघांना आपला जीव गमवावा लागला. जखमी नम्रता आणि ग्यानेंद्रवर पुण्यातील औंध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.