पुणे : पुण्यातल्या भोर तालुक्यातील हरिश्चंद्री गावात ( Harishchandri village of Bhor taluka ) शेतात भात लावणीसाठी चिखल करीत असताना विजेचा धक्का लागल्यानं दोन बैलांचा मृत्यू झाला ( Two Bulls Died Due to Electric Shock ). तर पायात गमबूट असल्यानं रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोघे शेतकरी सुदैवाने थोडक्यात ( Farmer Ramesh Valhekar Luckily Survived ) ( Farmer Dnyaneshwar Gade Luckily Survived )वाचले. खाचराच्या बांधावर असणाऱ्या विजेच्या खांबातून वीजप्रवाह शेतातल्या पाण्यात उतरल्याने ( Electric Current Fell into Field Water ) ही घटना घडली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या घटनेने शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आजूबाजूच्या परिसरात भात लावणीची लगबग : गेल्या आठवडाभरापासून भोर तालुक्यात पडत असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे भात लावणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची भात लावणीसाठीची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यातील हरिश्चंद्री गावातले शेतकरी रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोघे भातलावणीसाठी बैलाच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने शेतात चिखल करीत होते. या दरम्यान बांधावर असलेल्या विजेच्या खांबाचा वीजप्रवाह शेतातल्या पाण्यात उतरला. त्यामुळे विजेचा धक्का लागल्याने बैल अचानक खाली कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.