शिरूर (पुणे) -तालुक्यातील बाभुळसर गावात एकाच कुटुंबावर कोरोनाचा आघात होऊन एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन भावांच्या मृत्यूमुळे संपुर्ण गावात शोककळा पसरली आहे. विठ्ठल भगवान नागवडे (वय ६५), सुभाष भगवान नागवडे (वय ५९) अशी कोरोनाने मृत्यू झालेल्या दोन भावांची नावे आहेत.
मागील पंधरा दिवसापुर्वी बाभुळसर गावातील नागवडे कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला. यामध्ये दोन सख्ख्या भावांना कोरोनाची लागण झाली. यावेळी दोघांनाही वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान एका भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच दुसऱ्या भावाचाही मृत्यू झाला आहे.
शिरूर तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचे संकट भिषण झाले आहे. यातुन कोरोनाचा समूह संसर्ग होऊन ग्रामीण भागातील अनेक गाव, वाड्या वस्त्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन अनेक नागरिकांचा ही मृत्यू झाला आहे.
पुणे : एकाच दिवसात दोन सख्ख्या भावांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू - पुणे लेटेस्ट न्यूज
मागील पंधरा दिवसापुर्वी बाभुळसर गावातील नागवडे कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला. यामध्ये दोन सख्ख्या भावांना कोरोनाची लागण झाली. यावेळी दोघांनाही वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान एका भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच दुसऱ्या भावाचाही मृत्यू झाला आहे.
दोन सख्ख्या भावांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू