पुणे - गेल्या काही दिवसांपासून शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव, शिक्रापूर परिसरात दुचाकी चोरीच्या सत्रात मोठी वाढ झाली होती. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी शिरुर येथील दोन चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचून केले अटक केली आहे. अनिल विठ्ठल वेताळ व आकाश बबन चित्तर असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आणि आकाश हे दोघे मोटार सायकल चोरी करण्यासाठी रांजणगाव एमआयडीसी येथे येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एमआयडीसी परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. या दोघांकडून शिक्रापुर आणि रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या २ दुचाकी तर इतर ५ अशा एकुण ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.