महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुर्मिळ मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना पुण्यात अटक

शिक्रापूरच्या दिशेने प्रमोद व सागर हे दोघे तरुण दुचाकीवरुन जात असताना दोघांकडुन काळ्या रंगाचा दुर्मिळ मांडूळ जातीचा साप असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. यावरून शिक्रापूर पोलिसांनी सापळा रचून वाडा गावठाण हद्दीतील कल्याणी फोर्ज कंपनीच्या मागील बाजूस दोन आरोपींना मांडूळ सापासह ताब्यात घेतले

Eryx johnii snake
दोन आरोपी मांडुळ सापांसह ताब्यात

By

Published : May 19, 2021, 7:40 AM IST

शिक्रापूर (पुणे) - शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाची तस्करी करुन विक्रीसाठी जात असलेल्या दोन तरुणांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून दुर्मिळ जातीचा मांडूळ साप जप्त करत दोघा युवकांना अटक करण्यात आली आहे. प्रमोद साळुंखे ,सागर जाधव अशी अटक केलेल्या दोन मांडुळ तस्करांची नावे आहे.

प्रतिक्रिया - हेमंत शेडगे, पोलीस निरिक्षक

पुणे नगर महामार्गावरुन शिक्रापुरच्या दिशेने प्रमोद व सागर हे दोघे तरुण दुचाकीवरुन जात असताना दोघांकडुन काळ्या रंगाचा दुर्मिळ जातीचा मांडुळ जातीचा साप असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. यावरून शिक्रापूर पोलिसांनी सापळा रचुन वाडा गावठाण हद्दीतील कल्याणी फोर्ज कंपनीच्या मागील बाजुस दोन आरोपींना मांडुळ सापांसह ताब्यात घेतले आहे. या दोघांना विविध वन्यजीव कलमांन्वये अटक करण्यात आली आहे. असे पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले. काळे मांडुळ ही दुर्मिळ जात असल्याने त्याला मोठ्या किमतीत विक्री केली जाते. त्यामुळे या सापाची तस्करी केली जाते.

हेही वाचा - बंगालच्या निवडणुका झाल्या आहेत, आता राजकारण थांबवा - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details