दौंड (पुणे)- कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू आहे. यावर पोलिसांकडून कारवाईही केली जात आहे. त्याप्रमाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दौंड व वारुळवाडी नारायणगाव ( ता.जुन्नर) अशा दोन ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली.
या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एकूण ६ रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर मुद्देमाल, असा एकूण किंमत रुपये १ लाख १९ हजार ७६९ रुपयेचा मुद्दे माल जप्त केलेला आहे. यातील दोन जणांवर दौंड पोलीस स्टेशन येथे तर एकावर नारायण गाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
काळाबाजारात विक्री होत असल्याची माहिती:
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी पुणे जिल्ह्यात कोरोना रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजार रोखण्यासाठी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दौंड गावच्या हद्दीत अक्षय राजेश सोनवणे आणि सुरज संजय साबळे ( रा . दौंड ) या दोघांनाही रेमडेसिवीर अधिकच्या दराने विक्री करताना सापडले. ते दोघे 32 हजार रुपयाला एक इंजेक्शन विकत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३ रेमडेसिवीर इंजेक्शन आणि दोन मोबाईल किंमत २०,००० रुपये व होंडा अॅक्टीव्हा दुचाकी ( ७० हजार) असा एकूण ९ ७ हजार ८७९ रुपये किंमतीचा माल मुद्देमाल जप्त केला.