पुणे :येरवडा कारागृहात स्थानबद्ध असलेल्या कुख्यात गुंड गजा मारणे आणि निलेश घायवळ या दोघांनाही सुरक्षिततेच्या कारणावरून नागपूर आणि अमरावती मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे. गजानन मारणेची नागपूर तर निलेश घायवळाची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
कारागृहातून सुटल्यानंतर काढली होती जंगी मिरवणूक
खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर गजा मारणे याने जंगी मिरवणूक काढली होती. या मिरवणूकीनंतर पोलिसांवर टीका करण्यात आली. त्यानंतर त्याच्या विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. फरार झालेल्या गजा मारणे याला सातारा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर एका वर्षांसाठी त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती.