पुणे - एका तरुणीकडून 24 लाख किमतीचे 54 ग्राम मेफेड्रोन सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे. नयनतारा गुप्ता (वय 28) असे तरुणीचे नाव आहे.
पुण्यातील एनआयबीएम परिसरात ही तरुणी मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या महिलेला अटक केली. या महिलेवर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यासोबत तिच्याकडून 416 एलएसडी स्टॅम्प देखील जप्त करण्यात आले आहे. पुणे विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात एलएसडी स्टॅम्प जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.