शिरुर(पुणे) - अल्पवयीन मुलीला मंदिराच्या मागे नेऊन अश्लिल व्हिडिओ दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील पाबळ येथे घडली आहे. आरोपीने पीडितेला मारहाण केली असल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नराधम तरुणासह मदतीला असणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगी घराजवळून बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या पालकांनी व नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला असता, ती एक मंदिराच्या बाजूला रडताना आढळून आली. त्यावेळी तिच्याकडे विचारणा केली असता, पीडित मुलीने आपल्या आईला घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलिसात तक्रार दाखल केली.