महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 14, 2021, 6:47 PM IST

ETV Bharat / state

आरसा नसलेल्या दुचाकींवर कारवाई : 13 दिवसांत 12 लाखांचा दंड वसूल

पुणे वाहतूक पोलिसांनी आरसे नसलेल्या दुचाकीस्वांरावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील 13 दिवसांचे तब्बल 12 लाख 49 हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.

पोलीस
पोलीस

पुणे -वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून दरवर्षी कोट्यवधींचा दंड वसूल केला जातो. मागील वर्षांपासून पुणेकरांना हेल्मेटसक्ती, मास्कसक्तीला तोंड द्यावे लागत आहे. या नियमांचा भंग करणाऱ्या हजारो पुणेकरांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पुणेकरांना वाहतुकीच्या नियमांकडे बोट दाखवत दंड वसुली केली जाणार आहे. जर तुमच्या दुचाकीला दोन्ही बाजूचे आरसे नसतील तर तुमच्याकडून दोनशे रुपयांचा दंड घेतला जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पुणे पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली.

13 दिवसांत 12 लाख 49 हजारांचा दंड वसूल

1 ते 13 जानेवारी या कालावधीत वाहतूक पोलिसांनी 6 हजार 248 वाहनचालकांवर कारवाई करत 12 लाख 49 हजाराचा दंड वसूल करण्यात आलाय. पुणे शहरातील चौकाचौकात ही कारवाई सध्या जोरात सुरू आहे. अनेक दुचाकी चालकांना तर आरसे नसल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचा भंग होतो याची कल्पना देखील नाही. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई करताना वाहतूक पोलीस व वाहन चालक यांच्यामध्ये वादावादी होतानाही पाहायला मिळते.

अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक

दुचाकीस्वाराच्या सुरक्षिततेसाठी व अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण, अनेक दुचाकीचालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे दुचाकीला आरसा न लावणाऱ्या वाहनचालकांना नियम समजावेत, यासाठी वाहतूक पोलिसांनी आता दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे पुणे शहरात यापुढे दुचाकीला आरसा नसल्यास वाहनचालकांकडून दोनशे रुपये दंड आकारला जाणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी ही माहिती दिली.

आरसा नसल्यास ओव्हरटेक करताना किंवा वळण घेताना होऊ शकतो अपघात

ओव्हरटेक करताना किंवा वळण घेताना दुचाकींना दोन्ही बाजुला आरसा असणे परिवहन विभागाकडून सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, अनेक दुचाकीस्वार वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. दुचाकीला आरसा नसल्यामुळे ओव्हरटेक करताना किंवा वळण घेताना पाठीमागून आलेल्या वाहनाकडून अपघात झाले आहेत. त्यामुळे दुचाकीला आरसे बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. पण, अनेक दिवसाची चालकांना याचा विसर पडला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी नव्या वर्षात अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा -नवीन मोटार वाहन कायदा चांगला, पण भ्रष्टाचाराला वाव

ABOUT THE AUTHOR

...view details