पुणे- कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची सुत्रे हातात घेतल्यानंतर गुन्हेगारीमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र, तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. या दरम्यान, दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले परिमंडळ दोनमधील पोलीस ठाणे हद्दीतील १२ गुन्हेरांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
वाकड आणि देहूरोड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांकडे तडीपारीचे प्रस्ताव पाठवले होते. गुन्हेगारांची पार्श्वभूमी पडताळून तब्बल १२ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. हे गुन्हेगार हिंजवडी, वाकड, देहूरोड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून त्यांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यातील तडीपार केलेले आरोपी पुढील प्रमाणे-
सुधाकर शिवाजी लिमकर (रा. पुनावळे, पुणे), तुषार महादू बावकर (रा. मुळशी, पुणे)
वाकड पोलीस ठाण्यातील तडीपार केलेले आरोपी-