महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिलेच्या पोटातून काढली तब्बल साडेतीन किलोची गाठ - पुणे जिल्हा बातमी

सायली भारत चव्हाण या महिलेला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. मात्र, त्यांच्या पोटात ट्युमर असल्याच समोर आले.

Tumor was removed from a woman stomach
महिलेच्या पोटातून काढली तब्बल साडेतीन किलोची गाठ

By

Published : Jan 21, 2020, 6:06 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून साडेतीन किलो ट्युमरची गाठ काढली आहे. त्यामुळे महिलेला जीवनदान मिळाले आहे. सायली भारत चव्हाण (वय-26) असे या महिलेचे नाव आहे. साडेसहा तास शस्त्रक्रिया करून महिलेचे प्राण वाचवल्याने डॉक्टरांचे कौतुक होत आहे.

महिलेच्या पोटातून काढली तब्बल साडेतीन किलोची गाठ

हेही वाचा -विवाह सोहळ्याला देशभक्तीचा रंग; पुण्यात अनोखा उपक्रम

सायली भारत चव्हाण या महिलेला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. मात्र, त्यांच्या पोटात ट्युमर असल्याच समोर आले. त्यावेळी खासगी रुग्णालयात हा न झेपणारा खर्च पाहून चव्हाण कुटुंबीयांनी महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार करण्याचे ठरवले. तेव्हा, डॉ. संजय पाडाळे, महिला डॉक्टर कांचन वायकुळे यांच्याकडे उपचार सुरू करण्यात आले.

महिलेच्या पोटातून काढली तब्बल साडेतीन किलोची गाठ

हेही वाचा - पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची' स्थापना

त्यानंतर डॉक्टरांनी सायली यांच्यावर उपचार सुरू केले. सोनोग्राफी करण्यात आली, त्यावेळी त्यांच्या पोटात तब्बल 15×15×15 (सें.मी) चा ट्युमरचा गोळा असल्याच आढळले. त्यामुळे चव्हाण कुटुंब तणावाखाली होत. परंतु, डॉक्टरांनी सायली यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याच ठरवले. तब्बल साडेसहा तास अथक प्रयत्न करत डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली. डॉक्टारांनी सायली यांच्या पोटातून तब्बल साडेतीन किलोची गाठ काढली.

ABOUT THE AUTHOR

...view details