महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आषाढी वारी: हिंदू-मुस्लिम ऐक्य दर्ग्यापाशी तुकोबांची पहिली आरती...

पुंडलिका वरदे हरी विठ्ठलच्या गजरात तुकोबांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. देहू नगरी टाळ मृदंगाच्या गजरात आणि ग्यानबा तुकारामच्या जयघोषात दुमदुमून निघाली. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत.

tukoba-palkhi-first-aarti-at-hindu-muslim-unity-dargah
हिंदू-मुस्लिम ऐक्य दर्ग्यापाशी तुकोबांची पहिली आरती...

By

Published : Jun 30, 2020, 5:01 PM IST

पुणे- तुकोबांच्या पादुका आज देहू येथून एसटी बसमने पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. पहिली आरती हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद अनगडशाह बाबा येथे झाली. यावेळी मुस्लिम बांधवांनी मोठ्या श्रद्धेने तुकोबांच्या पालखीचे स्वागत करुन आरती केली. तुकाराम महाराजांच्या आवडत्या शिष्यापैकी एक अनगडशाह बाबा असल्याने पालखी सोहळ्याच्या पहिल्या आरतीचा मान हजरत सय्यद अनगडशाह बाबा दर्गा येथे आहे.

हिंदू-मुस्लिम ऐक्य दर्ग्यापाशी तुकोबांची पहिली आरती...


पुंडलिका वरदे हरी विठ्ठलच्या गजरात तुकोबांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. देहू नगरी टाळ मृदंगाच्या गजरात आणि ग्यानबा तुकारामच्या जयघोषात दुमदुमून निघाली. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. फुलांनी सजावट केलेल्या बसमध्ये यंदा तुकोबांच्या पादुका मार्गस्थ झाल्या आहेत.

एसटी बससोबत पोलिसांचा बंदोबस्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पालखी सोहळ्यातील पायी वारी रद्द केली. त्यामुळे 12 जूनला प्रस्थान झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका मुख्य मंदिरात मुक्कामी होत्या. त्यानंतर आज दुपारी विठ्ठलाच्या भेटीला जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका मार्गस्थ झाल्या असून पहिली आरती अनगड शहा बाबांच्या इथे झाली. दरवर्षी पालखीतून जाणाऱ्या पादुकांचे मोठ्या भक्ती भावाने मुस्लिम बांधव स्वागत करतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसमध्ये असलेल्या पादुकांची बाहेरुनच आरती करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details