पुणे- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर होणाऱ्या अभिषेकामुळे भाविकांना वेठीस धरले जाते. अभिषेकामुळे समाधीची झीज होत असल्याच्या तक्रारी भाविकांकडून येत आहेत. यात भरीस भर म्हणजे पुजारी भाविकांची लूटही करतात, अशाही तक्रारींचा सूर भाविकांकडून अनेक दिवसांपासून आळवला जात आहे. यालाच गांभीर्याने घेत विश्वास्थांनी समाधीवरील अभिषेकची प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुजारी भाविकांची लूट करतात म्हणून घेण्यात आला 'हा' निर्णय... - आळंदी पुजारी विरोध
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर होणाऱ्या अभिषेकामुळे भाविकांना वेठीस धरले जाते, पुजारी भाविकांची लूटही करतात आणि अभिषेकामुळे समाधीची झीज होत असल्याच्या तक्रारी भाविकांकडून येत आहेत. यालाच गांभीर्याने घेत विश्वास्थांनी समाधीवरील अभिषेकाची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जगभरातील वारक-यांसह प्रत्येक नागरिकाचे श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर अभिषेक कायमचा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वास्थांच्या या निर्णयाला पुजाऱ्यांनी विरोध केला असून त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी नगरीत पायी वारी करत येऊन इंद्रायणी घाटावर स्थान करुन समाधीवर अभिषेक करण्याची प्रथा विश्वस्तांनी बंद केली. यासाठी पर्याय म्हणून चल पादुकांवर अभिषेक करण्याची नवी प्रथा सुरू करण्यात आली. पण याला पुजाऱ्यांनी विरोध सुरू केला असून भाविकांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.