महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-सोलापूर महामार्गावर झेंडूच्या फुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात, २ जण गंभीर - पुणे सोलापूर महामार्ग

पुणे-सोलापूर महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अपघातग्रस्त वाहन

By

Published : Jul 20, 2019, 6:23 PM IST

पुणे - पुणे-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातानंतर तेथून काही अंतरावर झेंडूची फुले वाहून येणाऱ्या वाहनाला अपघात झाला आहे. या घटनेमध्ये २ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त वाहन

पुण्याच्या दिशेने झेंडूची फुले वाहून नेणाऱ्या वाहनाला कदम वस्ती ग्रामपंचायती जवळ ट्रकने धडक दिली आहे. त्यामुळे झेंडूची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्यामुळे वाहनातील चालक आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच वाहनातील सगळी झेंडूची फुले महामार्गावर पसरली आहेत. दरम्यान, कदम वस्ती परिसरामध्ये झालेल्या या दोन मोठ्या अपघाताच्या घटनांमुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details