महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाटस घाटात उभ्या ट्रकला धडक; एक ठार तर सहा जखमी - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग

दौंड तालुक्यातील पाटस घाटात एक मालवाहू ट्रक उभा होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला या टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात छोट्या टेम्पो मधील एक जण ठार तर सहा जण जखमी झाले आहे. लग्नाला जात असताना ही घटना रविवारी पहाटे घडली.

उभ्या ट्रकला धडक
उभ्या ट्रकला धडक

By

Published : May 16, 2021, 4:23 PM IST

दौंड (पुणे) -पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस घाटात उभ्या ट्रकला छोट्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात छोट्या टेम्पोमधील एक जण ठार तर सहा जण जखमी झाले आहे. लग्नाला जात असताना रविवारी पहाटे ही घटना घडली.

सोलापुरला लग्न समारंभ असल्यामुळे पुणे येथून एका टेम्पोमध्ये (एमएच 12 एसएक्स 2440) सात जण जात होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस घाटात एक मालवाहू ट्रक (एमएच 50 एन 3191) उभा होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला या टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना दौंड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर सईद सिराज शेख (वय 19, रा. अप्पर सरगम, पुणे ) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर शबाना नबी भेळमे (वय 40), नबी इब्राहीम भेळमे (वय 45), कसक नबी भेळमे (वय 16), पैगंबर ऊर्फ सकलेन नबी भेळमे (वय 13, सर्व रा. भवानी पेठ, कासेवाडी पुणे) तसेच तफिसा सिराज शेख, समीरा सिराज शेख, महेक सिराज शेख, (रा. अप्पर सरगम चाळ, पुणे) तर वाहन चालक अमीन नुरुद्दीन मुजावर (वय 23) हे या अपघातात जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details