पुणे -दिवाळीनंतर त्रिपुरारी पोर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो. त्रिपुरारी नावाच्या राक्षसाच्या वधानंतर देवांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दिपोत्सव साजरा केला होता. असे सांगितले जाते. देशभरातून आलेल्या भाविकांनी भीमाशंकर येथे देवे लावत विद्युत रोषणाई केली.
भीमाशंकर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दिपोत्सव हेही वाचा - सांभर तलावाभोवती आढळले हजारो पक्षांचे मृतदेह..
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर येथे डोळे दिपवून टाकणारा दीपोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. मंदिर व मंदिर परिसरातील प्रांगणातील दिपमाळ लखलखून गेली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती व शिवलिंगाची सभा मंडपात विविध रंगाच्या फुलांमध्ये रांगोळी काढून सजविण्यात आले होते.
त्रिपुरारी पौर्णिमेची आख्यायिका -
तारकासूर नावाचा असुर होता त्याला ताराक्ष, कलाक्ष व विद्युन्माली असे तीन पुत्र होते तारकासुराच्या या तीन पुत्रांनी देवदेवतांना छळण्यास सुरुवात केली. हा प्रकार असह्य झाल्याने महादेवांनी त्यांच्याशी संग्राम करून त्या तीनही पुत्रांचा म्हणजेच त्रिपुरारीचा बिमोड केला. त्यावेळी आजच्या दिवशी असूर शक्तिचा नाश झाल्यामुळे देवांनी पहिल्यांदा भीमाशंकर येथे दीपोत्सव साजरा केला. हीच परंपरा आजही तशीच सुरू आहे. भीमाशंकर येथील शिवमंदिरात देशभरातून अनेक भाविक येऊन या दीपोत्सवाचे साक्षीदार होत आहेत.
हेही वाचा - राष्ट्रपती राजवट असली तरी सत्ता स्थापन करता येते - उल्हास बापट