महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरेगाव भिमा - विजयस्तंभावर फटाक्यांच्या आतिषबाजीने शौर्यदिनानिमित्त मानवंदना - Heroism Day celebrated at Koregaon Bhima

कोरेगाव भीमा येथे नववर्षाच्या सुरूवातीला विजयस्तंभावर फटाक्यांची अतिशबाजी करत मानवंदना देण्यात आली . शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

tribute-was-paid-to-the-victory-pillar-at-koregaon-bhima
कोरेगाव भिमा - विजयस्तंभावर फटाक्यांच्या आतिषबाजीने शौर्यदिनानिमित्त मानवंदना

By

Published : Jan 1, 2021, 2:47 AM IST

कोरेगाव भिमा (पुणे) - कोरेगाव भीमा येथे नववर्षाच्या सुरुवातीला विजयस्तंभावर रात्री बारा वाजता फटाक्याची आतिशबाजी करत विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली. विजयस्तंभावरील शौर्याचे प्रतिक म्हणून मानल्या जाणाऱ्या आजच्या दिवशी विजयस्तंभावर फुलांमध्ये तिरंगा रेखाटून विद्युतरोषणाई करत स्तंभ सजवण्यात आला आहे. आजच्या नववर्षाच्या सुरवातीला विजयस्तंभाला मानवंदना देऊन आपल्या देशावर आलेल्या कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे हीच प्रार्थना मानवंदना देताना करण्यात आली, असल्याचे विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले

कोरेगाव भिमा - विजयस्तंभावर फटाक्यांच्या आतिषबाजीने शौर्यदिनानिमित्त मानवंदना

जगभरामध्ये नववर्षाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने केली जात आहे. याच धर्तीवर कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभावर 203 वा शौर्यदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. नववर्षाच्या सुरुवातीला रात्री बारा वाजता फटाक्यांची अतिषबाजी करत आंबेडकर चळवळीतील विविध संघटनांच्या उपस्थित सलामी देऊन मानवंदना देण्यात आली.

1 जानेवारी 2021 ला दिवसभर विजयस्तंभावर धार्मिक व परंपरेनुसार विधी वाहक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. शौर्यदिनाचा हा सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा होत असला तरी विजय स्तंभावरील उत्साह कायम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details