पुणे -कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन अहोरात्र कार्य करत आहे. याचबरोबर अत्यावश्यक सेवा सुरळीत रहाव्यात आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे महानगरपालिकेच्या विविध भागातील कर्मचारी कोरोनाची भीती न बाळगता आपली सेवा देत आहेत. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचा गौरव करण्यासाठी पुणे महापालिका आणि कुमार प्रॉपर्टीज तर्फे एक ध्वनीचित्रफितीची निर्मिती केली आहे. या ध्वनीचित्रफीतीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
पुण्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 'त्यांच्या'साठी ध्वनीचित्रफितीद्वारे मानवंदना - pune corona song
कोरोनाच्या या संकटात पुणे महानगरपालिकेच्या विविध भागातील कर्मचारी कोरोनाची भीती न बाळगता आपली सेवा देत आहेत. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचा गौरव करण्यासाठी पुणे महापालिका आणि कुमार प्रॉपर्टीजने एक ध्वनीचित्रफितीची निर्मिती केली आहे.
हेही वाचा -कंपन्यांना आता 'सीएसआर'द्वारे करता येणार राज्य सरकारला मदत; मुख्यमंत्र्यांनी उचलले 'हे' पाऊल..
याद्वारे नागरिकांना संदेश ही देण्यात आला आहे. कुमार प्रॉपर्टीजतर्फे करोना विषाणू विरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस अकरा लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. तर पुणे कटक मंडळ अर्थात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर एबीआयएलच्या सहकार्याने ससून रुग्णालयासाठी 15 लाख किमतीची वैद्यकीय उपकरणे देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 25 हून अधिक बांधकाम कामगारांना एक महिन्याचे अन्य धान्य किराणा याचे देखील वाटप करण्यात आले.