पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये 17 तारखेला सभा होत आहे. पुण्यातील सर परशुराम(एसपी) महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेच्या मैदानावर असलेली दहा ते पंधरा झाडे कापल्याचे समोर आले आहे.
सर परशुराम(एसपी) महाविद्यालयाच्या मैदानातील या झाडांवर पंतप्रधानांच्या सभेसाठी कुऱ्हाड चालवण्यात आल्याची चर्चा आहे. महानगरपालिकेच्या परवानगीनेच झाडे तोडल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. तर महाविद्यालयाच्या संस्था चालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही झाडांच्या फांद्या तोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.