महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत, राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब - माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायती

राज्य शासनाकडून माळेगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीवर झाल्याचा आज शिक्कामोर्तब केला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामपंचायती की नगरपंचायत असा संभ्रम निर्माण झालेल्या माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

Malegaon Gram Panchayat into Nagar Panchayat
Malegaon Gram Panchayat into Nagar Panchayat

By

Published : Mar 31, 2021, 5:27 PM IST

बारामती -राज्य शासनाकडून माळेगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीवर झाल्याचा आज शिक्कामोर्तब केला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामपंचायती की नगरपंचायत असा संभ्रम निर्माण झालेल्या माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत नगरविकास सचिवालयाकडून तब्बल तीन वेळा नगरपंचायतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाकडून ठोस निर्णय झाला नसल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७७ उमेदवारांपैकी ७६ जणांनी सामूहिक अर्ज माघार घेतल्याने ग्रामपंचायत निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे गेली पाच महिने झाले ग्रामपंचायत की नगरपंचायत याबाबत चर्चांना उधाण आले होते.


अखेर राज्याच्या नगरविकास उपसचिवांनी राज्यपालांच्या आदेशानुसार माळेगाव ग्रामपंचायत रद्द करून नगरपंचायत जाहीर केल्याचे नोटीस द्वारे प्रसिद्ध केले. दरम्यान नगरपंचायत बाबत नोटीस जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माळेगाव येथील राजहंस चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान माळेगाव नगरपंचायतीची अंतिम रचना होत नाही. तोपर्यंत नगरपंचायतीची कार्य व कर्तव्य पार पाडण्यासाठी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचे उपसचिव मोघे यांनी पत्रात नमूद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details