पुणे -महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सोमवारी सकाळी प्रशिक्षण विमान ( training plane crashed ) कोसळल्याने 22 वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी पायलट किरकोळ ( Training Plane Crashed In Indapur ) जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अधिकाऱ्यांनी जखमी प्रशिक्षणार्थी पायलटची ओळख भाविका राठोड ( Bhavika Rathod ) अशी केली आहे. हे विमान कार्व्हर एव्हिएशनचे आहे ज्याचे मुख्यालय जिल्ह्यातील बारामती येथे आहे. बारामतीतील विमानतळावरून सकाळी उड्डाण केलेले विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीनजीक कोसळले आहे. विमान ( plane crashed ) कशामुळे पडले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत महिला पायलट प्रशिक्षण दिले जात होते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून ( Baramati Airport ) उड्डाण केलेले हे विमान फिरत असतानाच अचानक कडबनवाडी येथील शेतकरी बारहाते यांच्या शेतात कोसळले आहे.
पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) अभिनव देशमुख यांनी सांगितले की, राठोड “सकाळी 11.30 च्या सुमारास झालेल्या अपघातात किरकोळ जखमी झाल्या आहेत”. त्यांना शेलगाव परिसरातील खासगी रुग्णालयात नेण्यापूर्वी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताच्या वेळी राठोड विमानात एकट्याच होत्या,असे पोलिसांनी सांगितले.
'हे' आहेत आतापर्यंतचे विमान अपघात -
13 जून 2022 - रोजी उत्तर प्रदेशातील अमेठी येथे प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे हलके विमाण कोसळे होते. विमाण क्रॅश-लँड झाल्याने पायलट अभय पटेल थोडक्यात बचावले होते. ते केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उरण अकादमी (IGRUA) चे प्रशिक्षण-विमान उडवत होते.
16 जून 2022 -झारखंडमधील जमशेदपूर येथे 16 जून 2022 रोजी दोन प्रशिक्षण विमानांचा अपघात झाला होता. त्यानंतर विमान वाहतूक नियामक DGCA ने सर्व उड्डाण प्रशिक्षण संस्थांचे (FTOs) सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. जमशेदपूर येथे झालेल्या अपघातात पायलट लँडिंग गियर उघडण्यास विसरला, तर दुसरे विमान उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे धावपट्टीवर कोसळले होते.