महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Training Aircraft Crashed : बारामतीजवळ प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं; एकजण जखमी - बारामतीजवळ प्रशिक्षण विमान कोसळलं

पुणे जिल्ह्यातील बारामती एमआयडीसी परिसरातील कटफळ गावाजवळ प्रशिक्षणादरम्यान एका प्रशिक्षण विमानाचा अपघात झालाय. यात दोनजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.

Etv Bharat
बारामतीजवळ विमान कोसळलं

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 7:17 PM IST

Updated : Oct 19, 2023, 8:47 PM IST

शिकाऊ विमान कोसळलं

पुणे : Training Aircraft Crashed Baramati :पुणे जिल्ह्यातील बारामती एमआयडीसी परिसरातील कटफळ गावाजवळ प्रशिक्षण सत्रादरम्यान प्रशिक्षण विमान कोसळलं. झालेल्या घटनेत एकजण जखमी झाला आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

रेडबर्ड कंपनीचं होतं विमान : बारामती तालुक्यातील कटफळ गावच्या हद्दीत एक शिकाऊ विमान कोसळलंय. बारामतीतील रेडबर्ड इन्स्टिट्यूट (रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमी) या विमान प्रशिक्षण संस्थेचे हे विमान असून, येथील कटफळ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच विमान कोसळलंय. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. बारामती विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर हे विमान तांत्रिक बिघाडामुळं कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये अनेक विमान प्रशिक्षण संस्था विमान चालविण्याचे प्रशिक्षण देत आहेत.

जखमींवर उपचार सुरू : रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीचे प्रशिक्षण विमान बारामती तालुक्यातील कटफळ गावाजवळ गुरुवारी (19 ऑक्टोबर) संध्याकाळी 5 वाजता कोसळलंय. या विमानात पायलट आणि आणखी एक व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच तत्काळ सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहचल्या होत्या. यातील जखणींना बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली.

इंदापूरमध्येही घडली होती अशीच घटना : बारामतीत कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षण संस्थेमधील एका संस्थेचे शिकाऊ विमान काही महिन्यांपूर्वी कोसळलं होतं. या घटनेत विमानाचे नुकसान झाले होते. या घटनेत प्रशिक्षणार्थी महिला पायलट बचावली होती. ही घटना ताजी असतानाच सदर घटना घडली आहे.

हेही वाचा -

  1. IAF Fighter Jets Crashed: वायूसेनेच्या दोन विमानांचा अपघात.. एक मध्यप्रदेशात तर दुसरे पडले राजस्थानात, एक वैमानिक ठार
  2. Fighter Jets Crashed in MP: वायुसेनेच्या मिराज-सुखोईची हवेत टक्कर, अपघातात वैमानिक शहीद
  3. Nepal Plane Crash : नेपाळ विमान दुर्घटनेत पर्यटनासाठी गेलेल्या उत्तर प्रदेशच्या पाचही जणांचा मृत्यू
Last Updated : Oct 19, 2023, 8:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details