पुणे -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यातच येथील दोन वर्षांसाठी प्रशिक्षणावर असलेल्या डॉक्टरांनी मानधनात वाढ व्हावी, या मागणीसाठी आंदोलन केले आहे. यावेळी 'समान काम समान वेतन', अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 'समान काम समान वेतन'चा नारा; डॉक्टरांचे मानधनासाठी आंदोलन - पुणे लेटेस्ट न्युज
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दोन वर्षांचा प्रशिक्षण (सिपीएस) कोर्स असून यासाठी डॉक्टरांना २४ हजार रुपये मानधन दिले जाते. सध्या कोरोनाचे संकट आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे मानधन वाढवावे, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी केली आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दोन वर्षांचा प्रशिक्षण (सिपीएस) कोर्स असून यासाठी डॉक्टरांना २४ हजार रुपये मानधन दिले जाते. सध्या कोरोनाचे संकट आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे मानधन वाढवावे, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांची पगारवाढ केलेली आहे, तर मुंबई महानगरपालिकेने देखील तेथील डॉक्टरांचे मानधन वाढवले आहे. मात्र, वारंवार महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्रव्यवहार करून मानधन वाढवण्यात येत नाही, असे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आज संबंधित डॉक्टरांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे.