जुन्नर (पुणे) -माळशेज घाटातील करंजाळे येथील खिंडीजवळ बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी धोकादायक दरड असल्याने माळशेज घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे.
माळशेज घाटात कोसळली दरड; सहा तासानंतर रस्ता वाहतूकीसाठी खुला - माळशेज घाटात दरड कोसळले बातमी
माळशेज घाटातील करंजाळे येथील खिंडीजवळ मध्यरात्री दरड कोसळले होते. यामुळे तब्बल सहा तास हा रस्ता वाहतूकीसाठी बंद होता. दरम्यान, या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
LAND SLIDE
यात भाजीपाला, शेतमाल, प्रवासी वाहतूक यांचा खोळंबा झाला होता. मात्र, आज (दि. 6 ऑगस्ट) सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने घाटातील रस्ता खुला करण्यात आला आहे. सध्या वाहतूक सुरळित सुरू आहे.
पावसाळ्यात माळशेज घाटात अनेक ठिकाणी धबधबेच असतात. हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक या घाटात गर्दी करत असतात. कोरोनामुळे यंदा पर्यटकांसाठी हा घाट बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, वाहतूकीसाठी हा मार्ग खुला आहे.