महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंदापुरात कापड व्यापाऱ्याची आत्महत्या; गोदामातच घेतला गळफास - कापड दुकानदार इंदापूर

इंदापूर मध्ये एका कापडविक्रत्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

कापड व्यापाऱ्याची आत्महत्या
कापड व्यापाऱ्याची आत्महत्या

By

Published : Dec 16, 2020, 2:23 PM IST

बारामती- इंदापूर शहरातील कापड दुकानदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. शहरातील मोरया जिन्स या कापड दुकानाचे ते मालक होते. गणेश देविदास सनगर( वय ४०, रा.शास्त्री चौक, इंदापूर) असे या आत्महत्या केलेल्या दुकानदाराचे नाव आहे.

सनगर यांच्या आत्महत्येने इंदापूर शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. सनगर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे इंदापूर पोलिसांनी सांगितले. या आत्महत्ये प्रकरणी सुभाष देवीदास सनगर( वय ४४, रा.शास्त्री चौक इंदापूर) यांनी याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सनगर यांनी त्यांच्या कपड्याच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये दोरीने गळफास घेतला आहे. त्यांना उपचारासाठी अकलूज येथील खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details