पुणे -भिमाशंकर परिसरातील आल्हाट येथे दगडी डबर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टरमधील दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचा -हातभट्टीची दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
दत्ता पुनाजी आढळ (वय 33) व विलास गंगाराम बुरुड (वय 29) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत, तर संतोष सोमाजी किर्वे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.