पुणे - जुन्नर तालुक्यातील ओतुर-ओझर या अष्टविनायक मार्गावर पुष्पावती नदीवरील पुलावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघातात झाला असून यात ट्रॅक्टर पुलाचा कठडा तोडून तरंगत होता. यावेळी ट्रॅक्टरचालक फरार झाल्याने अष्टविनायक मार्गावर चार तास वाहतूककोंडी होती.
पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर - junnar news today
ट्रॅक्टर पुलाचा कठडा तोडून तरंगत होता. यावेळी ट्रॅक्टरचालक फरार झाल्याने अष्टविनायक मार्गावर चार तास वाहतूककोंडी होती.
वारंवार होणाऱ्या अपघातांकडे दुर्लक्ष
जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील सर्वच भागात ऊसतोड युद्धपातळीवर सुरू आहे. ऊस तोडणीनंतर ऊस वाहतूक करत असताना एका ट्रॅक्टरला दोन ते तीन ट्रॉली लावून धोकादायक वाहतूक सुरू आहे. त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त वाहतूक करत असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला. अशा घटना वारंवार होत असून याकडे पोलिसांसह, वाहतूक नियंत्रण विभाग व साखर कारखान्यांचे दुर्लक्ष होत आहे. अष्टविनायक मार्गावरून विघ्नहर साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर दोन ट्रॉलीसह कारखान्याच्या दिशेने जात असताना पुष्पावती नदीवरील तीव्र उतारावर चालकांचे ट्रॅक्टरवरील नियत्रंण सुटले. ट्रॅक्टर पुलाचा कठडा तोडुन ट्रॅक्टरचा पुढचा भाग नदीपात्रावर अधांतरीच राहिला. सुदैवाने रस्त्यावर वाहतूक तुरळक असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या मार्गावर चार तास वाहतूकोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.