महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जीवधन किल्यावरुन पर्यटकांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष - जीवधन किल्यावरुन पर्यटकांचा जीवघेणा प्रवास

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात निसर्गाचे नयनरम्य रुप पहायला मिळते. त्यामुळे पुणे-मुंबईवरुन अनेक पर्यटक, ट्रेकर किल्ल्यावर फिरण्यासाठी येतात. मात्र, जीवधन किल्ल्यावरुन धोकादायक उतरण करताना पर्यटकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

जीवधन किल्यावरुन पर्यटकांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

By

Published : Aug 20, 2019, 9:46 PM IST

पुणे -सध्याच्या विकेंडमध्ये विरंगुळा म्हणून अनेक पर्यटक जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ला, नाणेघाट परिसरात जातात. मात्र, या जीवधन किल्ल्यावरुन धोकादायक उतरण करताना पर्यटकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

जीवधन किल्यावरुन पर्यटकांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात निसर्गाचे नयनरम्य रुप पहायला मिळते. त्यामुळे पुणे-मुंबईवरुन अनेक पर्यटक, ट्रेकर गड-किल्ल्यांवर फिरण्यासाठी येतात. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असून दगडांवरुन घसरण होण्याची भीती आहे. त्यामुळे पर्यटक व ट्रेकर्सने सुरक्षेसाठी उपाययोजना करुनच अशा धोकादायक ठिकाणांवरुन प्रवास करावा, असे आवाहन एकनाथ सांडभोर (ट्रेकर) यांनी केले आहे. या परिसरात होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी पर्यटक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details