महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : नाईट कर्फ्यूमुळे लोणावळ्याकडे पर्यटकांनी फिरवली पाठ

कोरोनामुळे आणि नाईट कर्फ्युमुळे लोणावळ्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

tourists-avoid-lonavla-due-to-night-curfew
पुणे : नाईट कर्फ्यूमुळे लोणावळ्याकडे पर्यटकांनी फिरवली पाठ

By

Published : Dec 31, 2020, 8:27 PM IST

पुणे -सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दरवर्षी लाखभर पर्यटक लोणावळ्यात हजेरी लावतात. 2020 हे वर्ष मात्र संकटमयी ठरले. यंदा पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दहा महिने थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नवा प्रकार आ-वासून उभा आहे. तसेच खबरदारी घेत प्रशासनाने नाईट कर्फ्यु लागू केला आहे. त्यामुळे काही पर्यटकांचा भ्रमनिरास झाला आहे.

पहिल्यांदाच लोणावळ्याकडे पर्यटकांची पाठ -

सरत्या वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाच स्वागत करण्यासाठी लोणावळ्यातील पर्यटनस्थळ दरवर्षी फुलून जातात. यावर्षी मात्र पर्यटकांनी 31 डिसेंबर रोजी पाठ फिरवली आहे. दरम्यान, ब्रिटन येथील कोरोनामुळे आणि नाईट कर्फ्युमुळे लोणावळ्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. सकाळ पासूनच पर्यटक लोणावळ्यात हजेरी लावतील अस वाटत होत. परंतु घरीच थांबून नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप देऊन नूतन वर्षाच स्वागत करणे पसंद केले आहे.

नाताळ आणि 31 दरम्यान लाखो पर्यटक येतात -

दरवर्षी किमान दोन ते तीन लाख पर्यटक नाताळ आणि 31 डिसेंबर दरम्यान लोणावळ्यातील पर्यटनस्थळी दाखल होतात. परंतु यावर्षीची परिस्थिती अत्यंत वेगळी असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले आहे. याचा फटका स्थानिक व्यवसाय आणि हॉटेल व्यवसायिकांनादेखील बसला आहे.

हेही वाचा - अ‌ॅमेझॉननंतर 'डॉमिनोज'ही मराठीचा वापर करणार, मनसेची मागणी मान्य

ABOUT THE AUTHOR

...view details