महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातल्या देशपांडे कुटुंबीयांची कार पानशेत धरणात कोसळली, पत्नीचा मृत्यू - पानशेत धरणात बूडून मृत्यू

धरणाच्या बाजूने कार जात असतानाच अचानक कारचा टायर फुटला आणि योगेश देशपांडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे कार थेट धरणाच्या पाण्यात जाऊन कोसळली. त्यानंतर काही वेळातच कारमध्ये पाणी शिरल्याने पाण्यात बुडू लागली. यावेळी समोर बसलेल्या योगेश आणि त्यांच्या मुलाने कारमधून बाहेर उडी मारली. मागील बाजूच्या काचा बंद असल्याने समृद्धी यांना बाहेर पडता आलं नाही.

कार पानशेत धरणात कोसळली, महिलेचा मृत्यू
कार पानशेत धरणात कोसळली, महिलेचा मृत्यू

By

Published : Aug 16, 2021, 10:41 AM IST

Updated : Aug 16, 2021, 10:48 AM IST

पुणे- पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबीयांची कार पानशेत धरणात कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या महिलेचा पती आणि मुलगा थोडक्यात बचावले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. समृद्धी योगेश देशपांडे (वय 33) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या नाव आहे. तर या महिलेचा पती योगेश देशपांडे (वय 35) आणि 9 वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावले आहेत. रविवारी पानशेत रस्त्यावरील कादवे गावाजवळ हा अपघात घडला.

कार पानशेत धरणात कोसळली,
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी सुट्टी असल्यामुळे देशपांडे कुटुंबीय पानशेत परिसरात पर्यटनासाठी आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते कारण कादवे गावाचा दिशेने निघाले होते. योगेश देशपांडे कार चालवत होते तर शेजारी त्यांचा मुलगा आणि पत्नी समृद्धी या पाठीमागे बसल्या होत्या. धरणाच्या बाजूने कार जात असतानाच अचानक कारचा टायर फुटला आणि योगेश देशपांडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे कार थेट धरणाच्या पाण्यात जाऊन कोसळली. त्यानंतर काही वेळातच कारमध्ये पाणी शिरल्याने पाण्यात बुडू लागली. यावेळी समोर बसलेल्या योगेश आणि त्यांच्या मुलाने कारमधून बाहेर उडी मारली. मागील बाजूच्या काचा बंद असल्याने समृद्धी यांना बाहेर पडता आलं नाही.

काच लावली असल्याने महिलेचा मृत्यू-

दरम्यान स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारीच असलेल्या एका हॉटेलमधील दोरी घेऊन एका नागरिकाने पाण्यात उडी मारत गाडीच्या टायरला दोरी बांधली आणि ती दोरी दुसऱ्या बाजूने झाडाला बांधून ठेवली. त्यामुळे कार आणखी खोल पाण्यात गेली नाही. त्यानंतर कारच्या मागच्या बाजूची काच फोडून समृद्धी यांना बाहेर काढले आणि तातडीने पानशेत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Last Updated : Aug 16, 2021, 10:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details