महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाबंदी उठल्यानंतर लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; 405 जणांवर कारवाई - कोरोनाचा लोणावळा पर्यटनावर परिणाम

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव होऊ नये तसेच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोणावळा पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, काल रविवार असल्याने आणि जिल्ह्याबंदी उठवल्याने लोणावळ्यात शेकडो वाहने एका रांगेत दिसत होती. यामुळे एकाच दिशने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

lonavala tourism  corona effect on lonavala tourism  lonavala latest news  लोणावळा टूरिझम  कोरोनाचा लोणावळा पर्यटनावर परिणाम  लोणावळा लेटेस्ट न्यूज
जिल्हाबंदी उठल्यानंतर लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; 405 जणांवर कारवाई

By

Published : Sep 7, 2020, 8:46 AM IST

पुणे -राज्य सरकारने नुकतीच जिल्हाबंदी उठवली असून लोणावळा शहरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, कोरोनाचा पार्श्वभूमीवर शहरात दाखल झालेल्या पर्यटकांनी तसेच नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्याने लोणावळा पोलिसांनी एकाच दिवसात 2 लाख 2 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंग न पाळणे, पर्यटन बंदीचे उल्लंघन, अशा एकूण 405 जणांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली.

जिल्हाबंदी उठल्यानंतर लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; 405 जणांवर कारवाई

लोणावळा शहरात पर्यटनबंदी असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 8 जणांवर कारवाई करण्यात आली. तर, मास्क न घालणाऱ्या 286 आणि सोशल डिस्टसिंग न पाळणाऱ्या 119 अशा एकूण 405 जणांवर लोणावळा पोलिसांनी बेधडक कारवाई केली. त्यांच्याकडून 2 लाख 2 हजार एवढा दंड वसूल केला आहे. तसेच, वाहतुकीसंदर्भातील नियम तोडणाऱ्या 58 जणांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच साडेतेरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्याबंदी उठल्यानंतर लोणावळा पोलिसांना आणखी सतर्क राहावे लागत आहे. लोणावळा शहरात पर्यटनबंदी असून करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करून पर्यटकांनी गर्दी करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details