पुणे - सलग सहा दिवसांपासुन उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत भिमाशंकर व हटकेश्वर येथे निसर्गाचे वेगवेगळ्या रुपातील चित्र पहायला मिळत आहे. पर्यटकही या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. जुन्नर तालुक्यातील हटकेश्वर येथील धबधबा उलटा मागे येत असल्याने याठिकाणी पर्यटकांचा वेगळाच आनंद पहायला मिळत आहे.
भिमाशंकर व हटकेश्वर परिसरात निसर्गाचे देखणे रुप उलट्या फिरणाऱ्या धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण.. - भिमाशंकर
सध्या पावसाचा जोर कायम असुन सर्वत्र डोंगर हिरव्यागार रुपाने बहरले आहे. पर्यटकही डोंगररांगामध्ये वेगवेगळ्या धबधब्यांवर जात पर्यावरणाचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे. उलट्या दिशेने येणाऱ्या धबधब्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने जात असून पावसात चिंब होत या धबधब्यांचा आनंद लुटत आहे.
पावसाळ्यात धबधब्याचे रुप फुलले...
सध्या पावसाचा जोर कायम असून सर्वत्र डोंगर हिरव्यागार रुपाने बहरले आहे. पर्यटकही डोंगररांगामध्ये वेगवेगळ्या धबधब्यांवर जात पर्यावरणाचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे. उलट्या दिशेने येणाऱ्या धबधब्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने जात असून पावसात चिंब होत धबधब्यांचा मनसोक्त आनंद लुटत आहे. दरम्यान धबधब्यांवर जात असताना प्रत्येकाने डोंगराळ भागातील धोकादायक ठिकाणावर जाण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.