पुणे- ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी म्हणून आळंदी नगरपरिषद व पोलिसांच्या माध्यमातून शहर परिसरात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक वस्तुंची दुकाने फक्त ४ तासच सुरू असणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, अशा सूचना नगरपरिषद व पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिल्या आहेत.
घराबाहेर पडल्यास होईल सक्त कारवाई; पुण्यातील आळंदी शहर प्रशासनाचा इशारा - कडक लॉकडाऊन आळंदी
नागरिकांकडून लॉकडाऊन पाळले जात नसल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. म्हणून, प्रशासनाकडून कडक धोरणांची अमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी समीर भुमकर यांनी दिली आहे.
माहिती देताना शहर प्रशासनातील अधिकारी
शहरातील नागरिकांकडून लॉकडाऊन पाळले जात नसल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भिती आहे. म्हणून, प्रशासनाकडून कडक धोरणांची अमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी समीर भुमकर यांनी दिली आहे. दरम्यान, कोरोना संक्रमितांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत असताना परिस्थितीचे गांभीर्य समजून नागरिकांनी घरीच राहण्याची गरज आहे.