पुणे विभागात कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ३६४, तर जिल्ह्यात २ हजार १०३
पुणे जिल्हयातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 103 झाली आहे. 499 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 1 हजार 489 आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 115 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 83 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
पुणे विभागात कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ३६४, तर जिल्ह्यात २ हजार १०३
By
Published : May 5, 2020, 9:37 AM IST
|
Updated : May 5, 2020, 11:09 AM IST
पुणे - विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २ हजार ३६४ वर पोहोचली असून ५५८ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर अॅक्टीव्ह रुग्णसंख्या १ हजार ६८१ आहे. आतापर्यंत १२५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८६ रुग्ण गंभीर असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ३६४, तर जिल्ह्यात २ हजार १०३
जिल्हानिहाय कोरोनाबाधितांची आकडेवारी -
जिल्हा
कोरोनाबाधीत
मृत्यू
पुणे
२ हजार १०३
११५
सातारा
७८
०२
सांगली
३४
०१
कोल्हापूर
१४
०१
सोलापूर
१३५
०६
पुणे जिल्हयातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 103 झाली आहे. 499 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 1 हजार 489 आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 115 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 83 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
आजपर्यंत २३ हजार ९४२ नमुन्यांची चाचणी -
आजपर्यंत विभागात 23 हजार 942 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 22 हजार 823 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 119 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 20 हजार 393 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 2 हजार 364 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 71 लाख 40 हजार 436 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 79 लाख 65 हजार 967 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 618 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.