पुणे - छत्रपती संभाजी महाराजांचा आज (५ एप्रिल) ३३० वा बलिदान दिन साजरा होत आहे. सकाळपासूनच लाखोंच्या संख्येने शंभुप्रेमी वढु व तुळापूर येथील बलिदान स्थळी दाखल होत आहे. यामध्ये तरुणाईचा सहभाग लक्ष वेधून घेत आहे. यावेळी शंभूप्रेमींनी समाधीस्थळाला अभिवादनासाठी तरूणांनी गर्दी केली होती.
छत्रपती संभाजी महाराजांचा ३३० वा बलिदान दिन; शंभूप्रेमींची गर्दी - tulapur
सकाळी वढु व तुळापुर येथे संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते शासकीय महाअभिषेक करण्यात आला.
सकाळी वढु व तुळापुर येथे संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते शासकीय महाअभिषेक करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या या दोन्हीही स्थळी शंभूप्रेमीसह शाळकरी मुलांनी महाराजांच्या शौर्याला मानवंदना दिली व संपुर्ण परिसर शंभुप्रेमींच्या घोषणांनी दुमदुमून गेला. बलिदानस्थळी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असुन दुपारनंतर विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीसांचा मोठा बंदोबस्त दोन्ही समाधीस्थळी तैनात करण्यात आला आहे.