पुणे - मारवाडी हॉर्स शोच्या निमित्ताने पुण्यात आजपासून दोन दिवसीय मारवाडी हॉर्स शोचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पुणेकरांना मारवाडी घोडे पाहणे, घोड्यांची स्पर्धा अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या स्पर्धेत देशी घोड्यांची एक लढाऊ चिवट आणि देखणी प्रजाती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारवाडी घोड्यामधील उत्तम घोडे पाहण्याची संधी अश्वप्रेमींना उपलब्ध झाली आहे.
पुण्यात दोन दिवसीय मारवाडी हॉर्स शोचे आयोजन - compitation
पुण्यातल्या रेस कोर्सवर हॉर्स शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये घोड्यांच्या वयोगटानुसार ६ प्रकारांमध्ये उत्कृष्ट घोड्यांची स्पर्धा घेतली जाते. देशभरातील अश्वप्रेमी आणि अश्व पालक या कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित होते.
इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे या शोचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातल्या रेस कोर्सवर हॉर्स शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये घोड्यांच्या वयोगटानुसार ६ प्रकारांमध्ये उत्कृष्ट घोड्यांची स्पर्धा घेतली जाते. देशभरातील अश्वप्रेमी आणि अश्व पालक या कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित होते. हॉर्स शोचा एक भाग म्हणून शनिवारी सकाळी मारवाडी घोड्यांची रेसही लावण्यात आली होती. ३ मार्चला या अश्व स्पर्धेची अंतिम फेरी आहे. अश्व स्पर्धा हे यंदाच्या या शोचे प्रमुख आकर्षण आहे. गेली ४ वर्ष हे हॉर्स शो भरविण्यात येत आहे. यंदा २२ मारवाडी घोडे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
ब्रिटिश काळात त्यांच्याकडील घोड्यांच्या प्रजाती भारतात आल्या, आणि येथील लढाऊ मारवाडी अश्वांची प्रजाती मागे पडली. परंतु आता अनेक अश्वप्रेमी देशी प्रजातींचे जतन व पालन पोषण करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. सध्या मारवाडी घोड्यांची परदेशात विक्री करण्यावर बंदी आहे. देशभर ठिकठिकाणी होणाऱ्या अश्वांच्या जत्रांमध्ये हे मारवाडी घोडे पाहायला मिळतात. पुण्यात होणारा मारवाडी हॉर्स शो हा त्यातीलच एक भाग असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. मारवाडी घोड्यांची रेस तसेच मारवाडी घोड्यांचा हॉर्स शो बघण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली होती. देशी प्रजातीच्या घोड्यांना अधिकाधिक प्रमोट करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जातो आहे. यापुर्वी मारवाडी घोडे रेसमध्ये उतरत नसत, मात्र आता हळूहळू ट्रेंड बदलत असून, मारवाडी घोडेसुद्धा मोठ्या प्रमाणात स्पर्धेत उतरत आहेत. घोड्यांच्या रेससाठी विशेष करून परदेशी जातीच्या घोड्यांना प्राधान्य देण्यात येते, मात्र आता मारवाडी घोडे यांसारख्या देशी प्रजातीला सुद्धा रेससाठी तयार केले जात आहे, त्यामुळे देशी प्रजातींवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत व्हावे, या उद्देशाने आयोजकांनी या हॉर्स शोचे आयोजन केले होते.