पुणे- दिवसेंदिवस पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. आज (बुधवार) दिवसभरात 87 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून, 7 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ही 2 हजार 824 वर पोहोचली आहे.
पुण्यात आज दिवसभरात 87 कोरोनाग्रस्तांची नोंद, तर 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू - pune latest news
पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. आज (बुधवार) दिवसभरात 87 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून, 7 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पुण्यात आज दिवसभरात 87 कोरोनाग्रस्तांची नोंद
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 जण ससून रुग्णालयातील आहेत. पुण्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 163 झाली आहे. दिवसभरात 87 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून, कोरोनाचा संसर्ग झालेले 168 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 115 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 32 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.