पुणे -पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवार) दिवसभरात 49 करोनाबाधित रुग्ण आढळले. यात शहराबाहेरील बाधितांचा देखील समावेश आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधितांची संख्या 354वर पोहोचली आहे. तर आज एक जण कोरोनामुक्त झालेला असून, त्याला घरी सोडण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 170वर गेली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन 49 कोरोनाबाधितांची भर पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. शहर दोन दिवसांपूर्वी रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. त्यानंतर बाधितांची आकडेवारी वाढली आहे. आज रविवारी शहरातील आणि शहराबाहेरील असे एकूण 49 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे आनंदनगर चिंचवड, सांगवी, थेरगाव, देहूरोड, जुन्नर, आंबेगाव येथील रहिवासी आहेत. तर खराळवाडी येथील रहिवासी असलेल्या एका रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
मध्यरात्रीपासून पिंपरी-चिंचवडमधील काही भाग सीलडांगे चौक, वाकड येथील (पंडित शोरुम-ओरिएंटल किचन हॉटेल-डांगे चौक रोड-प्रतिभा मोटर्स-पंडित शोरुम) व शास्त्री चौक, भोसरी येथील (बंधन बँक-अजय डिस्ट्रिब्युटर्स-हॉटेल शांघाय-एच. डी. एफ. सी. बँक एटीएम-श्रेयस मेडिकल-बंधन बँक) परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.