महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड : कर्ज फेडण्यासाठी भामट्यांनी घरात सुरू केला नोटांचा छापखाना

कोट्यवधींचे कर्ज फेडण्यासाठी काही भामट्यांनी घरातच नोटा छापण्यासाठी छापखाना सुरू केला होता. नोटा छापून त्यांनी एकाला 2 लाख 98 लाखाच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बोलवले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले.

जप्त मुद्देमाल व अटक आरोपींसह पोलीस पथक
जप्त मुद्देमाल व अटक आरोपींसह पोलीस पथक

By

Published : Aug 25, 2020, 7:37 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) -कोट्यवधींचे कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईच्या व्यक्तीने मालेगाव येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये कामगार असलेल्या व्यक्तींच्या मदतीने 6 लाखांच्या नोटा पिंपरी-चिंचवड परिसरातील एका घरात छापल्या. एक छोटासा छापखाना तयार केला होता. पोलिसांनी आरोपींकडून प्रिंटर, सकॅन्र, कलर, ट्यूब आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे
याप्रकरणी सुरेश भगवान पाटोळे (वय 40 वर्षे), प्रमोद अमृत गायकवाड (वय 33 वर्षे), अख्तर इकबाल अकबर मिर्झा (वय 57 वर्षे), खलील अहमद अब्दुलहमीद अन्सारी (वय 40 वर्षे), नय्यूम रहीमसाहेब पठाण (वय 33 वर्षे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खलील हा मुख्यसूत्रधार असून त्याने मिर्झाच्या मदतीने नोटा छापल्या असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारा मिर्झा याचे दहावी शिक्षण झालेले आहे. खलील अहमदसह अन्य आरोपींवर कोट्यवधींचे कर्ज असून ते फेडायचे कसे या विवंचनेत आरोपी होते. त्यांनी बनावट नोटा छापून दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्याच्या व कर्जाची परतफेड करण्याच्या उद्देशाने नोटा छापण्याची योजना आखली होती. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात राहणार सुरेश पाटोळे याची मदत घेतली गेली. त्याच्या चिखली परिसरात असणाऱ्या फ्लॅटमध्ये नोटा छापण्याचे काम सुरू झाले. दरम्यान, एका व्यक्तीचे कर्जाचे पैसे द्यायचे होते. त्यानुसार त्याला बोलवून 2 लाख 98 हजारांच्याया बनावट नोटा दिल्या. यावेळी त्यांना पिंपरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यानंतर हा सर्व प्रकारे समोर आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांचा पथकाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details