महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणांचा लष्करातील सहभाग वाढवण्यासाठी नौदल अधिकाऱ्यांची भारत भ्रमंती, कारद्वारे 9 हजार किलोमीटरचा प्रवास - भारत भ्रमंती

भारतीय नौदलाच्यावतीने एकूण ४ विभागात ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यांनी देशभरात ४५ दिवसात 9 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.

तरुणांचा लष्करातील सहभाग वाढवण्यासाठी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी कारद्वारे 9 हजार किलोमीटरची भारतभ्रमंती

By

Published : May 9, 2019, 10:04 PM IST

Updated : May 9, 2019, 11:25 PM IST

पुणे- देशवासीयांमध्ये नौदलाच्या कार्याचा प्रचार करून तरुणांचा लष्करातील सहभाग वाढवण्यासाठी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी कारद्वारे 9 हजार किलोमीटरची भारत भ्रमंती पूर्ण केल्याची माहिती आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर के. श्रीनिवासन यांनी दिली आहे.

तरुणांचा लष्करातील सहभाग वाढवण्यासाठी नौदल अधिकाऱ्यांची भारत भ्रमंती

लोणावळा येथील आयएनएस शिवाजी महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त २६ मार्च ते ९ मे या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेचा समारोप गुरुवारी आयएनएस शिवाजीच्या प्रांगणात झाला. त्यावेळी श्रीनिवास बोलत होते. यावेळी खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय नौदलाच्यावतीने एकूण ४ विभागात ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यांनी देशभरात ४५ दिवसात 9 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. प्रवासादरम्यान त्यांनी हजारो महाविद्यालयीन तरुणांना भेटून त्यांच्याशी संवाद देखील साधला आहे.

Last Updated : May 9, 2019, 11:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details